संग्रामपूर येथिल शेतकऱ्याने तयार केले मोटार सायकलवर चालणारे फवारणी यंत्र

- Advertisement -

शेगांव (बुलढाणा) : सचिन पाटील

आधुनीक तंत्रज्ञान, उपकरणे फवारणी यंत्र यामुळे तर पुरातन यंत्रणा सम्पुष्टात आली आहे जसे की, पेरणी यंत्र ,डवरणी,फवारणी आदी.ज्यामुळे मनुष्यबळ तसेच वेळ कमी लागुन शेतीची कामे हि पटापट होवू लागले आहे. परंतु शेतीची आधुनीक यंत्रनेला सुध्दा मात करणारे यंत्र सुध्दा आता शेतकरी तयार करू लागले आहेत की ज्यांनी कोणत्याच इंजीनीयरींग महाविदयालयात शिकले नाही किंवा त्या प्रकारची डिग्री सुदध घेतली नाही असाही व्यक्ती आधुनीक तंत्रज्ञननावर मात करेल हे चित्र आहे बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर तालुक्याच्या एका शेतकऱ्याचे.

       संग्रामपूर येथील शेतकरी संदीप गोपाळ राउत व परंपरागत शेती व्यवसायच करतो आणि शेतीमध्ये कोणत्या बियाणे,फवारणी आदी पाहीजे त्याची त्याला पुर्ण जाणीव आहे व सुशिक्षीत असल्यामूळै शेती पिकाबद्रल पूर्ण अनुभव पण आहे.याच शेतक:याने मोटार सायकलवर चालणारे व कमी वेळेत जास्त फवारणारी यंत्रणा तयार केली आणी ती यश्स्वी सुध्दा करून दाख्विली. संदीप हयाने त्याच्या दुचाकीवर मागील बाजुस लोखंडी अँगलने ज्यावर दोन पाण्याच्या कॅना बसेल असे ढाचा तयार करून तो पूर्णपणे फीट केला त्यावर 35 लिटरच्या दोन कॅन दोन्ही बाजुने ठेवता येतात त्यातुन पूर्ण फिटींग करून 11 नोझल व त्याचे स्वीच तयार केले. सदर फवारणी यंत्र हे जातांना सोयाबीनच्या सहा तास तर येतांना सहा तासावर फवारणी करते. सदर दुचाकीवर फवारणीचे काम  एका दिवसात 10 ते 12 एकर होवू शकते व एका एकरला या दुचाकीला एक पाव या हिशेबाने 10 ते 12 एकरात 3 लिटर पेट्रोल जाते. या फवारणी नोझलला प्रेशर येण्यासाठी अतिरीक्त 16  व्होल्टची बॅटरी बसविण्यात आली जया बॅटरीची चार्जींग ही मोटार सायकच्या इंजीनदवारेच होते.

फवारणी करीता वापरण्यात येणारे पेट्रोल पंप, हात पंप,यामध्ये तिन मजुर लागतात व एका दिवसात फक्त 5 ते 6 एकरच फवारणी होते मात्र संदीपच्या युक्तीतुन काढलेल्या दुचाकीवर एका दिवसात 10 ते 12 एकर फवारणी होते व मजुरसुध्दा फक्त एकच लागते. त्यामुळे मजुराची, पैशाची बचत होवून कमी वेळेत जास्त काम होते.

संदीपच्या या दुचाकीवर काढलेल्या फवारणी यंत्राची समस्त शेतकऱ्यांना एक कुतुहलीचा विषय बनला असून त्याची परिसरात वाहवाह होत आहे.

- Advertisement -