मुंबई :’तुझ्या इश्काचा नादखुळा‘ या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत इन्स्पेक्टर गौतम साळवी यांची एंट्री होणार आहे.
इन्स्पेक्टर गौतम एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहेत. मिश्किल आणि जिंदादील स्वभावाचा असा हा प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे. प्रत्येक गोष्टीचा ते बारकाईने आणि खोलात जाऊन अभ्यास करतात. गौतम साळवीच्या येण्याने मालिकेत नेमका काय धमाका होतो याची गोष्ट पुढच्या भागांमधून उलगडेलच. पण स्वाती आणि रघूचं आयुष्य नव्या वळणावर येणार हे मात्र नक्की.
- Advertisement -