Home शहरे पुणे संतश्रेष्ठ माउलींचा समाधीसोहळा 25 नोव्हेंबरला

संतश्रेष्ठ माउलींचा समाधीसोहळा 25 नोव्हेंबरला

0

आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वराजांच्या 724 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीची सुरुवात कार्तिक वद्य अष्टमीला म्हणजे बुधवारी (दि. 20) होणार आहे. देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने वारीची सुरुवात होईल, तसेच कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला असून, एकादशीनंतर येणाऱ्या द्वादशीचा क्षय झाल्याने समाधीदिन सोहळा 24 नोव्हेंबरऐवजी कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे 25 नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे यांनी दिली.