Home बातम्या ऐतिहासिक संत सेवालाल महाराज जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

संत सेवालाल महाराज जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

0
संत सेवालाल महाराज जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 15 : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, दिनेश चव्हाण, कक्ष अधिकारी तुषार राठोड, शिवाजी चव्हाण, निलेश जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.

००००

प्रवीण भुरके/स.सं