Home मनोरंजन संपत्तीच्या बाबतीत शाहरुख- अक्षयला लाजवतील मिथून चक्रवर्ती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

संपत्तीच्या बाबतीत शाहरुख- अक्षयला लाजवतील मिथून चक्रवर्ती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

0
संपत्तीच्या बाबतीत शाहरुख- अक्षयला लाजवतील मिथून चक्रवर्ती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

[ad_1]

हायलाइट्स:

  • यशस्वी अभिनेता आणि यशस्वी उद्योजक मिथुन चक्रवर्ती
  • पदार्पणातच मिळवला होता अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार
  • आतापर्यंत ३५० हून अधिक सिनेमांत केलेय काम

मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा समावेश अशा अभिनेत्यांमध्ये होतो की ज्यांनी पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. अशा या हरहुन्नरी कलाकाराचा आज १६ जूनला वाढदिवस आहे. मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव आहे गौरांग चक्रवर्ती. मिथुन यांचा जन्म १९५० मध्ये बांग्लादेशातील बारिसालमध्ये झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतामध्ये आले. मिथुन यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा त्यांना मिथुनदा या नावाने हाक मारली जायची. मिथुन यांनी त्यांचे शिक्षण कोलकातामधूनच पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळेच अभिनयाचे रितसर शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत प्रवेश घेतला.


पदार्पणातच मिळवला राष्ट्रीय पुरस्कार

मिथुन चक्रवर्ती यांनी १९७६ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांचा पहिला सिनेमा होता ‘मृगया.’ पहिल्याच सिनेमातील अभिनयासाठी मिथुन यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहोते. मिथुन हे अभिनयाबरोबरच अॅक्शन, नृत्यातही पारंगत होते. त्यांनी आतापर्यंत हिंदीबरोबरच बंगाली, ओडिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांत मिळून ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. मिथुन यांच्या अभिनय प्रवासातील काही रंजक आणि रोचक किस्से आहेत.

AssignmentImage-1274395092-1623818473

मिथुन यांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला तो ‘दो अंजाने’ या सिनेमातून. अर्थात या सिनेमामध्ये त्यांची अगदी छोटी भूमिका होती. त्यानंतर त्यांनी तेरे प्या मे, प्रेम विवाह, हम पांच, डिस्को डान्सर, हम से है जमाना, घर एक मंदिर, अग्निपथ, तितली, गोलमाल ३, खिलाडी ७८६, द ताशकंद फाइल्स अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

नृत्य हे पहिले प्रेम

अभिनयाव्यतिरीक्त मिथुन यांनी मार्शल आर्टमध्ये एक्सपर्ट असून ते ब्लॅकबेल्टधारक आहेत, हे अनेकांना माहिती नाही. ८० चे दशक मिथुन यांनी गाजवले होते. याच काळामध्ये अमिताभ बच्चन यांची कारकिर्दही बहरू लागली होती. याच काळात मिथुन यांचे मेरा रक्षक, सुरक्षा, तराना, हम पांच, डिस्को डान्सर, प्यार झुकता नहीं यांसारखे हिट सिनेमे दिले. डिस्को डान्सर या सिनेमाने मिथुन यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यामुळेच त्यांचे चाहतेही खूप वाढले. आजही मिथुन यांना नृत्य करायला खूप आवडते. ते त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांच्यासाठी डान्स करणे हे देवाची पूजा करण्या इतकेच महत्त्वाचे आहे. आता वयोमानपरत्वे ते या झगमगत्या दुनियेपासून लांब गेले आहेत.

AssignmentImage-529368846-1623818474

हिंदी सिनेमातील नृत्याला मिथुन चक्रवर्ती यांच्यामुळे एक नवीन ओळख मिळाली. एक काळ असा होता की, एखादा सिनेमा मिथुन यांच्या नृत्यामुळे खूप लोकप्रिय व्हायचा. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मिथुन यांनी त्यांची सहकलाकार योगिता बाली यांच्याशी १९७९ मध्ये लग्न केले.

यशस्वी कलाकार आणि यशस्वी उद्योजकही

मिथुन चक्रवर्ती एक यशस्वी अभिनेते आहेत, तसेच ते एक यशस्वी उद्योगपती देखील आहेत. मिथुन यांच्या मालकीची अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

AssignmentImage-1717486657-1623818474

पुरस्कारांचे मानकरी

मिथुन चक्रवर्ती यांना अभिनयासाठी दोन वेळा फिल्मफेअर आणि तीन वेळा राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. मिथुनदा यांनी एका लोकप्रिय डान्स रिअॅलिटी कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही काम केले आहे. असे म्हणतात की मिथुनदा सिनेमात यायच्याआधी डान्सिंग क्विन हेलन यांचे असिस्टंट म्हणून काम करायचे. अभिनयाच्या बाबतीत मिथुन माहीर होते. सिनेमातील शॉट ते एका टेकमध्ये पूर्ण करायचे, ही माहिती स्वतः मिथुन यांनी २०१७ मध्ये प्रसारित झालेल्या डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातून दिली. त्यावेळी सलमान खानही स्टेजवर उपस्थित होता.


मिथुन चक्रवर्ती यांचं मढ आयलंडमध्ये प्रशस्थ बंगला आहे. १.५ एकर (६५ हजार ३४० चौरस फुट) जमिनीवर पसरलेल्या या प्रॉपर्टीची किंमत जवळपास ४५ कोटी ७३ लाख ८० हजार रुपये आहे. याशिवाय वांद्रे येथीही त्यांचा एक फ्लॅट आहे. तसेच उटीमध्ये अजून एक बंगला आणि रिसॉर्ट आहे. सध्या मोनार्च हॉटेल्स आणि रिसोर्ट हे देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या उटी बंगल्यावर १०० हून जास्त पाळीव श्वान आहेत.



[ad_2]

Source link