Home शैक्षणिक संपूर्ण भारतीय क्रिकेट संघापेक्षा तिप्पट पगार घेणार हा खेळाडू

संपूर्ण भारतीय क्रिकेट संघापेक्षा तिप्पट पगार घेणार हा खेळाडू

0
संपूर्ण भारतीय क्रिकेट संघापेक्षा तिप्पट पगार घेणार हा खेळाडू

पॅरिस: ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार याने पॅरिस सेंट जर्मन सोबतचा करार चार वर्षासाठी वाढवला आहे. यामुळे हा स्टार खेळाडू २०२५ पर्यंत पीएसजी क्लबसोबत असेल. या करारा सोबतच नेमार बार्सिलोनाकडून खेळणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

पीएसजीकडून खेळताना नेमारला चार वर्षात १०४ मिलियन पाउंड मिळतील. म्हणजेच प्रत्येक हंगामासाठी तो २६ मिलियन पाउंड इतकी रक्कम कमावणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम २६७ कोटी रुपये इतकी होते. क्रिकेटमधील सर्वात महाग असा संघ असलेला भारतीय क्रिकेट संघातील संपूर्ण खेळाडूंच्या पगारापेक्षा नेमारचा पगार तिप्पट आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चार श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येक वर्षाला ९६ कोटी रुपय देते. यातील A+ खेळाडूंना ७ कोटी इतकी रक्कम मिळते.

पीएसजीने शनिवारी या कराराची घोषमा केली. त्याच बरोबर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यात नेमारने एक जर्सी घेतली आहे आणि त्याच्या मागे २०२५ असे लिहले आहे. मी पॅरिस सेंट जर्मेन सोबत कायम असल्याने खुश आहे. संघाचा भाग असल्याचा अभिमान असल्याचे नेमार म्हणाला.

चार वर्षापूर्वी पीएसजीने २७ कोटी डॉलरला इतकी रक्कम मोजून नेमारला करारबद्ध केले होते. त्याने क्लबकडून ११२ सामन्यात ८५ गोल केले आहेत.

Source link