Home शहरे पुणे संभाजीनगर मधील उद्यानासमोरून दुचाकी चोरीला

संभाजीनगर मधील उद्यानासमोरून दुचाकी चोरीला

0

पुणे : परवेज शेख संभाजीनगर मधील उद्यानासमोरून दुचाकी चोरीला.निगडी : अज्ञात चोरट्यांनी उद्यानासमोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी दहा ते दुपारी पाच या कालावधीत संभाजीनगर येथील साई गार्डनसमोर घडली.

निलेश रामदास काळोखे (वय 20, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, फिर्यादी निलेश यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची (एम एच 14 / क्यू 1257) ही दुचाकी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास संभाजी नगर मधील साई उद्यानासमोर उभी केली. लॉक करून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली. दुपारी निलेश दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी बराच वेळ शोधाशोध केली मात्र, दुचाकी सापडली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.