संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे सिंगापूरकडे प्रयाण

संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे सिंगापूरकडे प्रयाण
- Advertisement -

मुंबई, दि. 20 – तीन दिवसांचा भारत दौरा आटोपून संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे आज रात्री 23.40 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सिंगापुरकडे प्रयाण झाले.

त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर भारताचे स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र रुचिरा कंबोज,मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव,  पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर तसेच राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -