संयुक्त संसदीय समितीची समांतर निवडणुकांबाबत आढावा बैठक; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी साधला संवाद – महासंवाद

'बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस' पुस्तिका उपयुक्त ठरतेय – आयुक्त कैलास पगारे – महासंवाद
- Advertisement -


मुंबई, दि. १९ : संविधान (१२९वा दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भातील संयुक्त समितीची बैठक खासदार पी.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेवर सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व इतर प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. समितीने समांतर निवडणुकांच्या संविधानिक, व्यवस्थापकीय आणि संभाव्य परिणामांबाबत सखोल चर्चा केली.

शासनाच्या स्थिरतेच्या अनुषंगाने, संविधानातील दहावी अनुसूची आणि पक्षांतरविरोधी कायद्यावरही चर्चा करण्यात आली. याशिवाय, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल, मुंबई उच्च न्यायालय वकील संघटना, एमएनएलयू मुंबई, NSE, BSE, MACCIA आणि महाराष्ट्र अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एकत्रित निवडणुकांमुळे होणारे कायदेशीर व आर्थिक फायदे, तसेच धोरणात्मक स्थिरतेतून मिळणारे लाभ या मुद्द्यांवर विचारमंथन झाले. संबंधित संस्थांनी एकत्रित निवडणुकांवर अधिक सखोल अभ्यास करून समितीसमोर अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

या बैठकीदरम्यान प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्याशीही संवाद साधण्यात आला. यासंदर्भात त्यांनी आपली मते मांडली.

000

संजय ओरके/विसंअ

- Advertisement -