Home ताज्या बातम्या संविधानाची एक प्रत प्रत्येकाच्या घरात असावी ,ती वाचाल तर वाचाल- रजाक शेख

संविधानाची एक प्रत प्रत्येकाच्या घरात असावी ,ती वाचाल तर वाचाल- रजाक शेख

पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी ) संविधानाची एक प्रत प्रत्येकाच्या घरात असावी.संविधान वाचले आत्मसात केले ,तरच तुम्ही वाचाल असे मा . मझर खान उवा मंचाचे रजाक शेक यांनी देहूरोड येथे नागरिकांना आवाहन केले.
प्रशांत जोगदंड , कार्याध्यक्ष मानव आधार सामाजिक संघ ,आंबेडकरनगर देहूरोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ,मा. मझर खान युवा मंचाच्या वतीने , केक कापणे ,दारू मटणाच्या वायफट खर्चाला फाटा देऊन ,एक संविधानाची प्रत देऊन अगदी सध्या पद्धतीने वाढ दिवस साईंगर येथे साजरा करण्यात आला .यावेळी मनुष्याच्या जीवनात संविधनाचे किती महत्व आहे .हे सांगण्यात आले. या प्रसंगी अरुण जगताप ,तन्वीर मुजावर ,रविआण्णा गदग , दीपक मधुरकर ,ईश्वर चलवादी ,विजय निकाळजे , व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस , तसेच उपाध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग पुणे , आणि मझर खान युवा मंचाचे संस्थापक ,मझर खान यांनी , कोविड- १९ सारख्या महामारीच्या काळात , कोणतीही जात पात ,न पाहता ,एक गरजवन्त असणाऱ्या व्यक्तींना ,अन्नधान्याचे किट अन्नदान ,गरजेच्या वस्तूंचे वाटप करून संघाच्या माध्यमातून एक मदतीचा हात दिला. कोणत्याची प्रसिद्धीची अशा न करता ,निस्वार्थी भावनेने ,हे सामाजिक कार्य केले आहे. तसेच कोणाचाही वाढ दिवस असो ,त्या व्यक्तीस मंचाच्या एक संविधनाची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो .