सई ताम्हणकर- क्रिती सेनॉनचा ‘मिमी’ ओटीटीवर होणार रिलीज? ‘या’ मराठी चित्रपटाचा आहे रिमेक

सई ताम्हणकर- क्रिती सेनॉनचा ‘मिमी’ ओटीटीवर होणार रिलीज? ‘या’ मराठी चित्रपटाचा आहे रिमेक
- Advertisement -


हायलाइट्स:

  • क्रिती सेनॉनचा ‘मिमी’ ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होण्याची शक्यता
  • सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री क्रिती सेनॉन
  • ‘मिमी’मध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचीही आहे महत्त्वपूर्ण भूमिका

मुंबई: अभिनेत्री क्रिती सेनॉननं आपल्या अभिनयच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘राब्ता’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या क्रितीनं आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आताही तिच्या अनेक उत्तम चित्रपट आहे. ज्यात तिच्या ‘मिमी‘ या चित्रपटाचाही समावेश होतो. मागच्या बऱ्याच काळापासून क्रितीच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे कारण हा चित्रपट एका मराठी चित्रपटाचा रिमेक आहे आणि आता या चित्रपटाबद्दल काही नवीन अपटेड आले आहेत.

रामयुग- खूप मॉडर्न असणार आहे वेब सीरिज- कुणाल कोहली

क्रिती सेनॉनचा मिमी हा चित्रपट सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या चित्रपटात ती नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात क्रिती सरोगेट मदरची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे क्रितीचा ‘मिमी’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केलं असून यात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट मराठीच्या ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.


फिल्मफेअरनं दिलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट दिनेश विजान यांना चित्रपटगृहातच रिलीज करायचा होता मात्र करोनाचं वाढतं संक्रमण पाहता त्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. दरम्यान हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार की नाही याबाबत निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे.

कंगनाची टिवटिव बंद झाल्याने बॉलिवूड कलाकार भलतेच खुश, म्हणाले


क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती येत्या काळात वरुण धवनसोबत ‘भेडिया’, दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘आदिपुरुष’, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बच्चन पांडे’, टायगर श्रॉफचा ‘गणपत’ आणि ‘हम दो हमरे दो’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.





Source link

- Advertisement -