सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आता दुकाने आणि मार्केट

- Advertisement -

मुंबई : दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत आज यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला.

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. या महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील ७ दिवस परवानगी देण्यात येत आहे. दुकानांना पी वन – पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासन संबंधीत दुकाने किंवा मार्केट बंद करेल. मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधीत मार्केट आणि दुकान मालक वापर करतील.

- Advertisement -