भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग हे दोघे जेव्हा सलामीला यायचे तेव्हा प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडायची. सचिन आणि सेहवाग यांना एकत्र सलामीला येताना पाहून बराच कालावधी लोटला आहे. पण हे दोघे आता पुन्हा एकदा भारतासाठी एकत्रपणे सलामीला येणाना पाहायला मिळणार आहे. काही मिनिटांपूर्वीच भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे. त्यामुळे जवळपास सात वर्षांनी सचिनच्या फलंदाजीची नजाकत वानखेडेवर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सचिनबरोबर आता सलामीला वीरेंद्र सेहवाग येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे
सचिन नोव्हेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर काही प्रदर्शनीय सामन्यांमध्ये सचिन खेळला होता. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिनने एकही सामना खेळला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी तब्बल पाच वर्षांनी सचिन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान तेंडुलकर चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. सचिनबरोबर सेहवागही बऱ्याच प्रदर्शनीय सामन्यांमध्ये पाहायला मिळाला. पण आता तर सचिन आणि सेहवाग कोणत्या दुसऱ्या तिसऱ्या नाही तर भारतासाठी सामने खेळताना पाहायला मिळणार आहे.
सचिन वानखेडेवर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे सामने खेळायला उतरणार आहे. या सीरिजमध्ये एकूण अकरा सामने खेळवण्यात येणार आहे. यावेळी भारताच्या संघात सचिनबरोबर वीरेंद्र सहवाग, युवराज सिंह, झहीर खानदेखील पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या संघात ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल हे दिग्गज खेळाडू दिसणार आहेत.
भारतीय संघ नेमका आहे तरी कसा, जाणून घ्या…
सचिन तेंडुलकर(कप्तान), वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, समीर दिघे (यष्टीरक्षक), इरफान पठान, अजित अगरकर, झहीर खान, संजय बांगर, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ, प्रज्ञान ओझा आणि साईराज बहुतुले.