सपोनि संदीप बागुल यांची उत्तम कामगिरी १७.९६ लाखांसह एटीएम मशीन पळवणारी टोळी जेरबंद

- Advertisement -

सपोनि संदीप बागुल यांची उत्तम कामगिरी
१७.९६ लाखांसह एटीएम मशीन पळवणारी टोळी जेरबंद

कोरोना संकट काळाचा गैरफायदा घेऊन नामांकित बँकेचे एटीएम मशीन पळवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही उत्तम कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा घटक – १ च्या पथकाने केली. या कारवाईत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ लाख रुपयांची रोकड व खदानीत फेकलेले एटीएम मशीन जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचे 2 मुख्यसूत्र अद्याप फरार असून, त्यांनाही लवकरच तुरुंगात धाडू, अशी माहिती गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील दहीसर ग्रामपंचायतीजवळील नामांकित एटीएम सेंटर आहे. या सेंटरमधील एटीएम मशीन (मॉडेल नं. २०१८) हे चोरीला गेले. त्या मशीनमध्ये १७ लाख ९६ हजार २०० रुपयांची रोकड होती. रोख रकमेसह एटीएम मशीन चोरीला गेल्या प्रकरणी बँकेने शिळडायघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी (गु. र. क्र. २८८ / २०२०) भादंवि कलम ३८०, ३४ नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे शाखा घटक १ चे पथक करू लागले.
तपासादरम्यान घटक १ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना खबऱ्याने एटीएम मशीन पळवणाºया टोळीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक १ चे पथक हाजीमलंग रोड येथे दाखल झाले. गुन्हे शाखा घटक ४ च्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालांडे, स्थानिक हिल लाईन पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक थोरवे यांच्या मदतीने घटक १ च्या पथकाने सूरज म्हात्रे (२९, रिक्षा चालक), फुलाजी महादु गायकर (३६, धंदा.झेरॉक्स दुकान) यांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार अतुल दवणे (२२, धंदा – मिस्त्री), परिसरातून दादासो ऊर्फ सूरज कांबळे (२४, धंदा – सिक्युरिटी), रशिद रौफ सय्यद (३४) यांनाही बेड्या ठोकल्या.

तपासादरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेला यांचा साथीदार भीम नेपाळी हा नेपाळ येथे मूळगावी पळाल्याची माहिती तपासादरम्यान पोलिसांना समजली. त्याुनसार गुन्हे शाखा घटक १ च्या पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या स्पेशल फोर्स टास्क पथकाला सदर माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस उप अधीक्षक पी. के. मिश्रा, पोलीस निरीक्षक ज्ञानेंद्रकुमार राय यांच्या पथकाने कानपूर-लखनौ महामार्गावरील टोलनाक्याजवळ एका खाजगी बसमधून नेपाळला पळून जाणाऱ्या भीमा महाबहादूर जोरा ऊ र्फ भीमा नेपाळी याला ताब्यात घेतले. सदर माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखा घटक १ चे पथक भीमाचा ताबा घेण्यास उत्तर प्रदेशला रवाना झाले.
यापैकी ४ जण सराईत आरोपी आहेत. या आरोपींनी लॉकडाऊनमध्ये कामधंदा नसलेल्या उर्वरित तिघांना पैशांचे आमिष दाखवून या गुन्ह्यात सहभागी केले होते. या सर्वांनी ठरवल्यानुसार एटीएम सेंटर गाठले. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेºयाचे वायर कापले व कटावणीच्या सहाय्याने सहज एटीएम मशीन गाडीतून नेले. हाजीमलंग रोड येथील कुंभाली गावाजवळ पैशांची वाटणी करून एटीएम मशीन काही अंतरावर असलेल्या खदानीत फेकून दिले. सदर गुन्ह्याचा कट रचणारे २ आरोपी अद्यापही फरार असून, लवकरच तेही तुरुंगात असतील, असा विश्वास गुन्हे शाखा घटक १ च्या पोलिसांनी व्यक्त केला.
या गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध – १) किसन गवळी, गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समीर अहिरराव, योगेश काकड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, कैलास सोनावणे, हवालदार आनंदा भिलारे, आबुतालीब शेख, सुनील जाधव, रवींद्र पाटील, प्रकाश कदम, सुभाष मोरे, शिवाजी गायकवाड, संभाजी मोरे, सुनील माने, नरसिंह महापुरे, रवींद्र काटकर, पोलीस नाईक संजय बाबर, दादासाहेब पाटील, विक्रांत कांबळे, किशोर भामरे, राहुल पवार, संजय दळवी, चंद्रकांत वाळुंज, अजय साबळे, पोलीस शिपाई (चालक) भगवान हिवरे आदी पथकाने केली.

- Advertisement -