उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ११ जून : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिग्वीजय कैलास शिंदे यांच्या उमरगा येथील पंचशील कॉलनीत त्यांच्या राहत्या घरात चोरी झाली आहे. चोरी करताना चोराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सभापतींच्या घरातच चोरीची घटना घडल्याने सामान्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बुधवारी १० जून रोजी सायंकाळी ७:४५ वाजता महेश ईराण्णा वजनदार (रा. हुमनाबाद, ता. बिदर) हा संधी साधून चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला. शयनगृहातील कपाट उघडून तो सामान अस्ताव्यस्त करत असतांना दिग्वीजय शिंदे यांच्या कुटूंबीयांनी त्यास पकडले. ही हकीकत त्यांनी पोलीसांना कळवल्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी जाउन चोरट्यास ताब्यात घेतले. अशा मजकुराच्या दिग्वीजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन चोराविरुध्द गुरुवारी ११ जून रोजी गुन्हा नोंदवला आहे.
- Advertisement -