सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’कादंबरीबर ही वेब सीरिज आधारित आहे.
समांतरच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. यानंतर दुसऱ्या सीजनचं दिग्दर्शन समीर विध्वंस करत आहेत. ताकदीचे दिग्दर्शक ही या वेब सीरिजची नेहमीच जमेची बाजू राहिली आहे.
‘समांतर’ या वेब सीरिजने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली होती. सिझन १ मध्ये स्वप्नीलने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते.