‘समांतर २’ वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकर दिसणार दुहेरी भूमिकेत?

‘समांतर २’  वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकर दिसणार दुहेरी भूमिकेत?
- Advertisement -


मुंबई : मराठी वेब सीरिजच्या विश्वामध्ये ‘समांतर २‘ वेब सीरिजची खूपच चर्चा आहे. ही वेब सीरिज येत्या एक जुलै रोजी रिलीज होणार आहे. ‘समांतर’ सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडीत यांची प्रमुख भूमिका आहेत.

‘समांतर’ च्या पहिला भाग अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन थांबल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता तेव्हापासून प्रेक्षकांना होती. कुमार महाजनने अथक प्रयत्नानंतर त्याच्यासारखेच नशीब असलेल्या, त्याच्यासारखे आयुष्य जगलेल्या सुदर्शन चक्रपाणीचा त्याने शोध घेतला. सुदर्शन सारखेच आयुष्य कुमार जगत आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आङे, हे त्याला माहिती आहे. पहिल्या भागाच्या शेवटी सुदर्शन चक्रपाणीने त्याच्या डाय-या कुमारच्या हवाली केल्या आहेत. डाय-या देताना सुदर्शनने कुमारला दरदिवशी एकच पान वाचण्याची अट घातलेली असते. या डाय-यांमध्ये सुदर्शनचा भूतकाळ आणि कुमारचे भविष्य असते.

सीरिजच्या शेवटच्या भागामध्ये चक्रपाणीच्या आयुष्यामध्ये एका महिलेचा प्रवेश होणार असल्याचे लिहिले असते आणि इथेच हा भाग संपला आहे. अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर ही सीरिज संपल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यामुळे या सीरिजचा पुढचा भाग कधी प्रदर्शित होणार हा प्रश्न सातत्याने ते विचारत होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता लवकरच संपली असून, येत्या एक जुलै रोजी ही वेबसीरिज प्रदर्शित होत आहे.

काही दिवसांपूर्वी समांतर २ चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा दुसरा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचला आहे. दुस-या भागामध्ये स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित हे तर असणार आहेच. शिवाय या दुस-या भागामध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. समांतर २ च्या ट्रेलरमध्ये सईची झलक दिसली आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांसाठी आणला आहे.

ही वेब सीरिज मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना १ जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.



Source link

- Advertisement -