Home गुन्हा सरकारी कामात अडथळा आणल्याने चार जणांविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणल्याने चार जणांविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

0

परवेज शेख पिंपरी, ०६ फेब्रुवारी : अटक आरोपीस पळून जाण्यास मदत करून सरकारी कामात अडथळा आणल्याने चार जणांविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारी रोजी दु. १.३० वा. सर्व्हट
क्वॉर्टर, शेवाळे सेंटर कंपनी आवार, पिंपरी, पुणे येथे पुणे रेल्वे पोलीस
ठाणेकडील तपासावर असलेला आरोपी नदीम गफूर शेख, वय १९ वर्षे
यास तपासकामी आणले. तेथे दाखल गुन्ह्याचा रेल्वे पोलीस तपास करीत असताना अटक आरोपीचे नातेवाईक व नमूद गुन्ह्यातील आरोपी यांनी संगनमत करून, रेल्वे पोलीस व त्यांच्या टीमसोबत वाद घालून व
आरडाओरडा करून तपासात अडथळा निर्माण केला. तेथे झालेल्या
गोंधळादरम्यान आरोपीने त्याचा हात काढणीतून काढून घेतला व
पोलिसांना धक्का देऊन तो तेथून पळून गेला. अशाप्रकारे अटक आरोपीस पळून जाण्याकरिता पोषक वातावरण तयार करून त्यास पळून जाण्यास मदत केल्याबद्दल १) नदिम गफुर शेख, वय-१९ वर्षे, २) सहारा नदीम शेख,वय-१९ वर्षे, ३) गफुर जावेद शेख, वय-३२ वर्षे, रा. बौद्धनगर, रिव्हर रोड, बिल्डींग नं. १६ च्या पाठीमागे, पिंपरी, पुणे, ४) मामे बहीण सुषमा रानू परदेशी, वय-१८ वर्षे, रा. सहँट क्वॉर्टर, शेवाळे सेंटर कंपनी आवार, पिंपरी, पुणे यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निमगिरे
करीत आहे.