सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे १२६ तक्रारींचे जलद निराकरण

सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे १२६ तक्रारींचे जलद निराकरण
- Advertisement -

मुंबई, दि. 8 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १४९८ तक्रारी आज दाखल झाल्या असून महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज १२६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे महिला व बालविकास विभाग आणि मुंबई महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम झाला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे  स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या  राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होती. महिला व बचत गटांना नोंदणी प्रक्रियेची माहिती  देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उद्या दिनांक ९ मे रोजी फोर्ट येथील ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी)  हा उपक्रम होणार आहे. महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

- Advertisement -