Home शहरे मुंबई सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय एकता दौड

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय एकता दौड

0


पुुणे : परवेज शेख सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे आज दिनांक 31/10/2019 रोजी राष्ट्रीय एकता दौड 2019 चे आयोजन करण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे. यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग किना-यावर प्रथम सर्वाना एकत्मतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर आलिबाग समुद्र किना-यावरून 07:30 वा.सुमारास मा. श्री. देवदत्त गजानन नागे (अभिनेता), मा. श्री. दिलीप हळदे मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, मा. श्री. अनिल पारस्कर,पोलीस अधीक्षक रायगड यांनी झेंडा दाखवला आणि एकता दौडला सुरुवात झाली. सदर एकता दौड ही 5 किलोमीटर अंतराची होती.


सदर एकता दौड करिता मा. श्री. देवदत्त गजानन नागे (अभिनेता), मा. श्री. दिलीप हळदे मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, मा. श्री. अनिल पारस्कर,पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग, डॉ.अजित गवळी जिल्हा शल्यचिकित्सक, मा.श्री.मनिष कुमार, जिल्हा वन अधिकारी, मा.श्री.सचिन गुंजाळ, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.पाटील, जिल्हा कारागृह अधिकारी, श्रीमती सोनाली कदम, उप विभागीय पोलीस अधिकारी अलिबाग, व पोलीस अधीक्षक कार्यालयातील तसेच अलिबाग पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, महसूल विभाग, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रातील पुरुष, महिला तसेच जेष्ठ नागरिक, अलिबाग शहरातील नागरिक, आर.एस.पी.विद्यार्थी हे सदर एकता दौड करिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.