Home ताज्या बातम्या सरसुविधांचा कमी पडू नयेत म्हणुन सर्वसाधारण रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरु करणे महापौर

सरसुविधांचा कमी पडू नयेत म्हणुन सर्वसाधारण रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरु करणे महापौर

मुंबई दि.६ – शफीक शेख

जून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या १६ सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये कुठल्याही परिस्थितीत आरोग्यसेवा – सुविधा कमी पडू नये यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा येथील महापौर निवासस्थानी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.

बोरीवलीतील भगवती रुग्णालय हे बोरीवली व दहिसर मधील नागरिकांसाठी महापालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. या परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनासाठी रुग्णालयात अधिक बेड उपलब्ध करून देण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. त्यासोबतच अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, रुग्णालयाच्या गरजेनुसार अतिरिक्त आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली होती. महापौरांनी यावेळी आरोग्य विभाग तसेच मध्यवर्ती खरेदी खाते यांचे उपायुक्त यांच्यासोबत उद्या महापौर बंगल्यावर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे कालच्या दौऱ्यादरम्यान सांगितले होते. त्या अनुषंगाने महापौर बंगल्यावर आज बैठक आयोजित करण्यात आली .

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा वाढण्याची मागणी लक्षात घेऊन सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या ऑक्सीजन सुविधेचे विस्तारीकरण करण्याची कारवाई सुरू असून पहिल्या टप्प्यात अधिक क्षमता असलेल्या ऑक्सिजन वाहिनी बसविण्याचे काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. तसेच अधिक क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर बसविण्यात येतील. जेणेकरून सोळाही सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची साठा करण्याची क्षमता वाढेल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २,६,१३ किलोलिटरच्या लिक्विड ऑक्सिजन टाक्या बसविण्याचे काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. तसेच पहिल्या टप्प्यातील काम हे येत्या गुरुवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महापौरांनी यावेळी रूग्णालयातील इतरही सेवा-सुविधांचा आढावा घेतला.

या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, विधी समिती अध्यक्षा श्रीमती शीतल म्हात्रे, सर्वसाधारण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख डॉ. प्रदीप जाधव, प्रमुख अभियंता ( यांत्रिकी व विद्युत) विजय पाचपांडे, भगवती रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती प्रतिमा पाटील, मध्यवर्ती खरेदी खात्याचे डॉ. राठोड हे मान्यवर उपस्थित होते.