Home गुन्हा सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे २७ गुन्हे उघड : २३ लाख २७ हजाराचा ऐवज हस्तगत

सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे २७ गुन्हे उघड : २३ लाख २७ हजाराचा ऐवज हस्तगत

0

पुणे : परवेज शेख

सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे २७ गुन्हे उघड : २३ लाख २७ हजाराचा ऐवज हस्तगत. पुणे:डॉ. के.वेंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर व रवींद्र शिसवे पोलीस सह.आयुक्त पुणे यांनी पुणे शहरामध्ये घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे घडू नये,व मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी पोलिस अभिलेखा वरील गुन्हेगारांचे हालचालीवर नजर ठेवून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.तसेच क्रिप्स सारख्या योजना राबवल्या जात आहेत,
गुन्हे शाखा युनिट (3) १४/०७/२०१९ रोजी पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना बातमी मिळाली रामटेकडी हडपसर परिसरात सापळा लावून पोलीस अभिलेखा वरील घरफोडी करणारे गुन्हेगार जीतसिंग उर्फ जितू राजपाल सिंग टाक – वय २३ वर्ष , हुकूमसिंग रामसिंग कल्याणी वय – २८ वर्ष , अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी वय- ३४ वर्ष
श्री विनायक प्रमोद खाडे रा प्रसन्न श्री अपार्टमेंट आयडियल कॉलनी कोथरूड पुणे यांचे घर बंद असताना रात्रौच्या वेळेस आरोपींनी दरवाज्याचे कोंड्या कापून घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून आतापर्यंत एकूण ४७० ग्राम
४७ तोळे वजनाचे सोन्याचे व ४०८० ग्राम (४ किलो) वजनाचे चांदीचे दागिने ,एक कार, एक मोटर सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे दोन कटावणी एक बोल्ट कटर ,दोन स्क्रू ड्रायव्हर असा एकूण 23 लाख 27 हजार रुपयाच्या ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कामगिरी पुणे शाखा ,पुणे शहरचे अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. बच्चन सिंग सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री .राजेंद्र मोकाशी ,पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड ,किरण अडागळे ,राजकुमार केंन्द्रे व गुन्हे युनिट 3 पथकातील पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर, प्रवीण तापकीर, संदीप तळेकर ,अतुल साठे, अनिल शिंदे ,संदीप राठोड ,रोहीदास लवांडे ,शकील शेख ,राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड ,दीपक मते, किशोर शिंदे, रामदास गोणते, सचिन गायकवाड, गजानन गानबोटे ,कैलास साळुंखे, कल्पेश बनसोडे ,विल्सन डिसोझा ,नितीन रावळ यांनी केली आहे.