Home ताज्या बातम्या सर्वसामान्यांच्या आकांक्षांना धक्का, रेपो रेट दरात कोणताही बदल नाही

सर्वसामान्यांच्या आकांक्षांना धक्का, रेपो रेट दरात कोणताही बदल नाही

0

नवी दिल्ली ।  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्वसामान्यांच्या स्वस्त कर्जाच्या आशांना धक्का दिला आहे. दोन दिवसांच्या आर्थिक धोरणांच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर कमी करण्यास नकार दिला. रेपो दर कमी केल्यास बँका स्वस्त व्याजदराने ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. मागील आढावा बैठकीनंतर आरबीआयने रेपो दर 5.15 टक्के निश्चित केला होता. हा दर अजूनही कायम राहील. रिव्हर्स रेपो दरही 4.90 टक्क्यांवर कायम आहे. आरबीआयने यापूर्वी सलग 5 वेळा व्याज दर कमी केले आहेत. या कालावधीत रेपो दर 1.35 टक्क्यांनी कमी झाला आहे.

दरम्यान, रोजगारावरील नवीन व सर्वसमावेशक सर्वेक्षणातून गोळा केलेल्या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीची पातळी 6.1 टक्के आहे. कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) संतोष गंगवार यांनी बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली. गंगावार यांनी सदनामधील प्रश्नोत्तराच्या वेळी पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, नवीन बेरोजगारी सर्वेक्षण 2017-18 आकडेवारी मंत्रालयाने सर्वेक्षण प्रक्रियेतील बदलानंतर वार्षिक आधारावर केले. त्याअंतर्गत घेण्यात आलेल्या नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण (पीएलएफएस) च्या आकडेवारीनुसार भारतातील कामगार शक्ती 36.9 टक्के आणि बेरोजगारीचा दर 6.1 टक्के आहे.