Home ताज्या बातम्या सर्वेक्षणाचे कामास अनुपस्थितीबाबत बारा उपशिक्षकांचे निलंबन

सर्वेक्षणाचे कामास अनुपस्थितीबाबत बारा उपशिक्षकांचे निलंबन

0

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत मनपा प्रशासनाकडून विविध कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. विविध स्तरावर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत विनासुचना रजा घेणे,कार्यालयीन आदेश न पाळणे याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना देउनही त्यांचेवर सोपविण्यात आलेले सर्वेक्षणाचे कामे न केल्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण झाले.याकारणास्तव पुणे मनपा शिक्षणमंडळाकडील संबंधित उपशिक्षक यांनी कार्यालयीन आदेशानुसार परिमंडळ उपायुक्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीयस्तरावर नागरी सर्वेक्षणाकरिता डॉ.वैशाली जाधव,सहाय्यक आरोग्य अधिकारी यांचेकडे कामास हजर होणे आवश्यक होते. तथापि सदरचे उपशिक्षक हजर झाले नाही व कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतरही खुलासे देण्यात आले नाही. अशाप्रकारचे शिस्तभंग व गैरवर्तनामुळे संबंधीत बारा उपशिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे मा.रुबल अगरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) यांनी कळविले आहे.