‘सर्वोत्कृष्ठ तहसीलदारा’च्या घरावर एसीबीची धाड : दागिन्यांसह लाखोंची रोकड जप्त

- Advertisement -

चेन्नई: तेलंगणाच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून आज रंगारेड्डी जिल्ह्याच्या तहसीलदार वी.लावण्या यांच्या घरावर छापे टाकले. यावेळी त्यांच्या घरातून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली तर लाखो रुपयांचे सोन्याचे दागिनेदेखील हस्तगत केले आहेत. लावण्या यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानावरून या वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वी. लावण्या यांना सर्वोत्कृष्ठ तहसीलदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या घरातून एवढी मोठी रक्‍कम जप्त करण्यात आल्याने त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

एका शेतकऱ्याकडून त्याच्या कामासाठी एका अधिकाऱ्याने लाच मागितल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतकऱ्याकडे तब्बल 8 लाखाची लाच मागण्यात आली होती. त्यातील 5 लाखाची रक्‍कम देण्यात आली होती. उर्वरित रक्‍कम देताना अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे एक शेतकरी चक्‍क लावण्या यांच्या पायावर पडून आपल्या बॅकेचे पासबूक देण्याची विनंती करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे लावण्या यांच्यावर ही कारवाई करण्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -