Home ताज्या बातम्या सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर

सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर

0

नवी दिल्ली :गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. 12 जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 15 दिवसांत पेट्रोलच्या दरात 2 रुपये 19 पैशांची घट झाली आहे. चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हायरसमुळे भारतासह अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 79.32 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 26 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.92 रुपयांवर आला आहे. याआधी शनिवारी (11 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 5 पैशांनी महागलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 81.60 रुपये मोजावे लागले.  तर डिझेलच्या दरात वाढ 13 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 72.53 रुपये होता.