मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काल म्हणजेत रविवारी १४ जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आली आणि सर्वांच्याच काळजात धस्स झालं.अनेक सेलिब्रिटींनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तररही अद्याप मिळालं नाहीए. तर अनेकांनी सिनेसृष्टीची एक काळी आणि नकारत्मक बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनानंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप यानं देखील बॉलिवूडच्या खान कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
अभिनव कश्यप यानं फेसबुकवर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याचं करिअर संपवण्यासाठी काय-काय प्रयत्न केले याबद्दल लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टमुळं सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.अभिनव कश्यप हा अभिनव दिग्दर्शक अनुराग कश्यपचा चुलत भाऊ असून त्यानं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी केलीए. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि सलमान खान तसंच यशराज फिल्मवरही अभिनवनं आरोप केलेत.
अभिनवनं त्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
अभिनव कश्यपनं YRF म्हणजेच यशराज फिल्मच्या एजन्सीवर गंभीर आरोप केलेत. या एजन्सीमुळं कदाचीत सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचललं असं त्यानं म्हटलं आहे. या फिल्म एजन्सी नवीन कलाकारांच आयुष्य आणि करिअर उंचीवर घेऊन जाण्याऐवजी त्यांना खाली खेचण्याचं काम करतात. मला याचा अनुभव आलाय. या एजन्सीचे अलिखित कोड ऑफ कंडक्ट आहेत. एकदा का कलाकारांनी त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केलं की या एजन्सीज आपली मनमानी सुरू करतात आणि त्यांना हवं तसं वागवून घेतात, असं अभिनव म्हणाला.
हा तर सुशांतचा प्लान मर्डर …कंगनाचा खळबळजनक आरोप
बॉलिवूडमधील या घराणेशाहीला मी देखील बळी पडलो असून‘दबंग’सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतरही माझा संघर्ष संपला नाहीए. ‘दबंग-२’मधून मला बाहेर काढण्यात आलं. याबद्दल मी बोललो त्यामुळं माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी खान कुटुंबानं अनेक प्रयत्न केले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली. अष्टविनायक फिल्म्स, वायाकॉम पिक्चर्स यांसारख्या अनेक कंपनींसोबत केलेले करार रातोरात मोडले गेले होते.
एखाद्याच्या निधनानंतर त्याच्या सहकाऱ्यांना दोष देणं चुकीच: सोनम कपूर
आर्थिक नुकसान तर झालंच परंतु गेल्या दहा वर्षातं मानसिक त्रासही झाला. आता मला माझे शत्रू कोण हे चांगलं कळालं आहे. सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हे तर आहेतच. परंतु या विषारी तलावात काही छोटे मासेही आहेत. परंतु खान कुटुंबिय पैशाचा, राजकीय ताकद आणि अंडरवर्ल्डचा वापर करून कोणालाही घाबरवू शकतात, असे थेट आरोप अभिनवनं केलं आहेत.
मला आशा आहे की, सुशांत जिथं असेल तिथं आनंदी असेल. पण यापुढं कोणत्याही निष्पाप कलाकाराला बॉलिवूडमध्ये आत्मसन्मानानं काम मिळालं नाही म्हणून जीव द्यावा लागणार नाही, असं अभिनव यांनी म्हटलं आहे.