सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो या सीनबद्दल बोलताना दिसत आहे. सलमान म्हणाला, ‘या चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे पण दिशाला किस केलेलं नाही. मी सेलोटेपवर किस केलं आहे. अशाप्रकारे हा सीन शूट करण्यात आला आहे.’ सलमान खाननं दिशाचं कौतुक केलं आहे. दिशाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘दिशा खूप चांगली मुलगी आहे. तिनं चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला एकाच वयाचे आहोत असं दिसायचं होतं. पण ती माझ्या वयाची नाही तर मी तिच्या वयाचा वाटत आहे.’ खरं तर दिशा आणि सलमानच्या वयात खूप मोठं अंतर आहे.
सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. या आधी हे दोघंही ‘भारत’ चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर आता त्यांनी ‘राधे’मध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्याची जोडी कमाल करेल असंच वाटत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं असून सलमान खान आणि दिशा पाटनी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.