Home ताज्या बातम्या सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

0
सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

हायलाइट्स:

  • मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले असल्याचे वृत्त आहे. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली.
  • ही घटना घडताच सर्वांची धावपळ झाली. या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई: मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले असल्याचे वृत्त आहे. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच सर्वांची धावपळ झाली. या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. (a large slab of sahyadri guest house collapsed environment minister aaditya thackeray escaped)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संध्याकाळी पावणे पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली होती. दरम्यानच्या काळात बैठकीच्या खोलीबाहेर असलेले शोभेचे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. या घटनेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपस्थित सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विविध विषयांवर बैठका घेऊन आढावा घेण्याचे काम करत आहेत. राज्यातील करोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट याबाबतच्या उपाययोजनांची ते माहिती घेत आहेत.

Source link