Home ताज्या बातम्या सांगवी : जिल्हा रुग्णालयात आणखी आठ करोनाबाधित

सांगवी : जिल्हा रुग्णालयात आणखी आठ करोनाबाधित

पिंपरी : सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आणखी आठ करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. बाधितांमध्ये राजगुरूनगर, जुन्नर आणि शिरूर तालुक्‍यातील सात जणांचा समावेश आहे. तर, दापोडीतील एक महिला रुग्ण आहे.

पिंपळवाडी-चासकमान (ता. राजगुरूनगर) येथील 16 वर्षीय मुलगी, 25 वर्षीय तरुण आणि 35 वर्षीय महिलेचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. पारुंडे (ता. जुन्नर) येथील एकाच कुटुंबातील दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 28 वर्षीय पुरुष आणि 41 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शिरूर तालुक्‍यातील न्हावरा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ महिला आणि 70 वर्षीय पुरुषाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, राक्षेवाडी (ता. राजगुरूनगर) येथील 50 वर्षीय महिला आणि येरवडा-रामनगर येथील 47 वर्षीय पुरुष रुग्ण आज करोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात आज नव्याने 16 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.