Home ताज्या बातम्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक

0
सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे पुनर्विलोकन सुरू असून त्यासाठी एक समिती आणि विषयवार दहा उपसमित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यातील रंगभूमी उपसमिती दि.27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहराच्या दौऱ्यावर येत असून रंगकर्मींनी या उपसमितीसमोर  सांस्कृतिक धोरणासंदर्भातील आपली निवेदने व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्याच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे होणार आहे. रेल्वे स्थानकाच्या विरुद्ध बाजूला राजनगरमधील हॉटेल द स्काय कोर्टच्या मारी गोल्ड हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये काळाच्या ओघात बदलणारे सांस्कृतिक बाबींचे स्वरूप, नाट्य क्षेत्रातील बदल नाट्यकर्मींच्या अडचणी, त्यांच्या सूचना इत्यादी विचारात घेतल्या जातील.

000

दीपक चव्हाण/विसंअ/