Home शहरे अहमदनगर साई बाबांच्या झोळीत भरभरून दान अर्पण

साई बाबांच्या झोळीत भरभरून दान अर्पण

0

शिर्डी:नातळाची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी साई बाबांच्या झोळीत भरभरून दान अर्पण केलं. अकरा दिवसात साईंच्या झोळीत तब्बल 16 कोटी 93 लाख रूपयांचे विक्रमी दान जमा झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन कोटीने दानात वाढ झाली आहे.

नाताळची सुट्टी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांनी शिर्डीत हजेरी लावली केली होती. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान केले आहे. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या अकरा दिवसात तब्बल 16 कोटी 93 लाख रूपयांचे दान बाबांना अर्पण करण्यात आले आहेत. यात देगणी कांऊटरवर 3 कोटी 46 लाख, चेक,डिडी, मनिऑर्डरद्वारे 1 कोटी 51 लाख, डेबीट/ क्रेडीट कार्ड 1 कोटी 38 लाख, ऑनलाईन देणगी 73 लाख, परकीय चलन 24 लाखांचे, सोने 1213 ग्रॅम किंमत 42 लाख, चांदी 17 किलो किंमत 24 लाख, अकरा दिवसात जमा झाले एकुण 16 कोटी 93 लाख रूपये. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा तीन कोटी रूपयांनी जास्त आ