पंढरपूर :तब्बल साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकचीसायकलवारी रविवारी (30 जून) सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाली आहे.
नाशिकच्या या सायकल वारीमध्ये 700 जणांचा सहभाग असून त्यात 15 डॉक्टर, 100 महिला आणि तीन अंध व्यक्ती आहेत. सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन ही सायकलवारी प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येते. या वारीचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. नाशिकहुन निघालेल्या सायकलवारीचा दीडशे किलोमीटर अंतर पार करून पहिला मुक्काम नगर येथे त्यानंतर पुन्हा दीडशे किलोमीटर अंतर पार करून दुसरा मुक्काम टेंभुर्णी येथे करून आज सकाळी पंढरीत ही सायकल वारी दाखल झाल्याची माहिती डॉ. गणेश कोळपे यांनी दिली आहे.
- Advertisement -