Home ताज्या बातम्या सातारा ; महाराष्ट्र सरपंच परिषदेचे शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा ; महाराष्ट्र सरपंच परिषदेचे शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

सातारा : (डॉ विनोद खाडे) महाराष्ट्र सरपंच परिषदेचे शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी,तसेच पावसाने सर्व रस्ते खराब झाले असून,अपघात संख्या वाढल्याने रस्ते दुरुस्ती ही तातडीने करावी,यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आले
यावर्षी अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानास हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.ही मदत खूपच कमी असून, ती किमान २५ हजार रुपये हेक्टरी मिळावी, तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून ती कामे व्हावीत, यासाठी जिल्ह्यातील सरपंच परिषदेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र भोसले,महिला अध्यक्षा मंदाकिनी सावंत,कार्याध्यक्ष आनंद जाधव आदींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिंघल यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून ग्रामीण भागातील विकास कामे, शेतकऱ्यांच्या अडचणी, विविध विकास कामांची माहिती घेतली,व प्रशासकीय मदत करण्याची ग्वाही दिली.यावेळी विविध गावच्या सरपंचांनी वेळोवेळी यापुढे प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी एकत्र येऊन जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी योगदान देतील ,असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.कार्यक्रमास सर्व तालुक्यातील अध्यक्ष, पदाधिकारी तसेच खटाव तालुका सरपंच अध्यक्ष डॉ महेश पवार, महिला अध्यक्ष शीतल देशमुख, नितीन जाधव,संपर्क प्रमुख नंदकुमार डोईफोडे आदींसह सुमारे 200 हुन अधिक सरपंच उपस्थित होते