Home ताज्या बातम्या साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी, कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी, कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू

सातारा : साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुषाचा आज (6 एप्रिल) पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 46 वर पोहोचला आहे. तर राज्यातील 748 जण कोरोनाबाधित आहे.

साताऱ्यात आज मृत्यू झालेल्या रुग्णाला 14 दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल फेर तपासणीत या रुग्णाचे निगेटिव्ह आले होते. मात्र आज पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण साताऱ्यातील पहिला कोरोना बळी ठरला. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबई शहरात रविवारी 103 नवीन ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. 2 एप्रिलपर्यंत शहरामध्ये 238 रुग्ण होते, तेव्हा रुग्णालयातील 310 खासगी बेडपैकी सुमारे 42% जागा भरल्या होत्या.

राज्यात कालच्या दिवसात (5 एप्रिल) 113 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे तर आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 458 वर पोहोचला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुबंई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
46. सातारा – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 6 एप्रिल

ताजी आकडेवारी पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई4582030
पुणे- पिंपरी चिंचवड (शहर+ग्रामीण)100165
सांगली254
ठाणे मंडळातील इतर मनपा –
(ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पालघर, वसई विरार, पनवेल, मिरा भाईंदर)
8236
नागपूर175
अहमदनगर213
लातूर8
बुलडाणा511
यवतमाळ43
सातारा3
औरंगाबाद751
उस्मानाबाद4
कोल्हापूर2
रत्नागिरी2
जळगाव21
सिंधुदुर्ग1
गोंदिया1
नाशिक1
वाशिम1
अमरावती11
हिंगोली1
इतर0
इतर राज्य (गुजरात)2
एकूण7485645