सामना झाल्यानंतर पाहा मैदानावर काय केले; व्हिडिओ झाला व्हायरल

सामना झाल्यानंतर पाहा मैदानावर काय केले; व्हिडिओ झाला व्हायरल
- Advertisement -

न्यूयॉर्क: अमेरिकेचा फुटबॉलपटू हसनी स्टीफेंसन याने रविवारी झालेल्या एका सामन्यात मैदानावरच गर्लफेंडला प्रपोझ केले. त्यावेळी स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक उपस्थित होते. या घटनेनंतर सर्व प्रेक्षक १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले; सात दिग्गज खेळाडूंना डच्चू द्यावा लागू शकतो

मेजर लीग सॉकर स्पर्धेतील सामन्यानंतर ही घटना घडली. हसनीने सॅन जोस अर्थक्वेक विरुद्धच्या सामन्यात मिनसोटा एफसीकडून खेळत होता. या सामना २-२ असा बरोबरीत सुटला. सामना झाल्यानंतर हसनीने गर्लफ्रेंड पेट्रा वुकोव्हिचला मैदानावर बोलवले. त्यानंतर त्याने गुडघ्यावर बसून सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंच्या समोर प्रपोझ केले. त्याने पेट्रोला रिंग देखील घातली.

वाचा- जेव्हा भारताच्या प्रशिक्षकाने सेहवागला कानखाली मारली; गांगुलीने घेतली टोकाची भूमिका

View this post on Instagram

A post shared by Hassani Dotson Stephenson (@hassanidotson)


वाचा- Video: मेसीची अफलातून फ्री किक; अर्जेंटीना उपांत्य फेरीत

पेट्राने तिच्या इंस्टाग्रामवर या घटनेचा फोटो शेअर केला आहे. माझ्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, असे तिने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. हसनीने जे प्रेम मला दिले आहे त्यासाठी मी त्याची खुप आभारी आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!

वाचा- आई आणि पत्नीचा ओरडा बसल्यावर क्रिकेटपटूने live सामन्यात मागितली माफी

हसनीने देखील सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Petra Vučković (@croatianchick31)


वाचा- लव्ह मॅरेज करणार की अरेंज? ‘नॅशनल क्रश’ क्रिकेटपटू स्मृती मंधानाने दिले स्मार्ट उत्तर



Source link

- Advertisement -