अमरावती, दि. 1 : सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचे वाटप व मार्गदर्शक माहितीचे प्रदर्शन असलेल्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते आज येथे झाले.
महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फेही संकुलाच्या परिसरात जनजागृतीपर स्टॉल लावण्यात आला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आदींनी या ठिकाणी भेट दिली.
सामाजिक न्याय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. पुस्तिकांचे वितरण ठिकठिकाणी होत आहे, अशी माहिती समाज कल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी दिली. सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
000