
मुंबई, दि. १३ : समाज कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्तींना दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्तींनी व संस्थांनी आपले अर्ज १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर.सी. चेंबूरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, चेंबूर (पूर्व) मुंबई, ७१ या पत्त्यावर विहित नमुन्यात सादर करावेत.
अधिक माहितीसाठी ०२२-२५२२२२०२३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
शैलजा पाटील/विसंअ/