मुंबई, दि. 17 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात समूह राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव विष्णुदास घोडके, राजेंद्र सवणे, अवर सचिव अशोक अहिरे, अश्विनी यमगर, रा.मा.गायकवाड, अनिल अहिरे तसेच सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*****
संध्या गरवारे/विसंअ/17.8.22