सामाजिक सुरक्षा विभागाकडून अपहरणाच्या गुन्ह्याची उकल

- Advertisement -

पुणे : परवेज शेख सामाजिक सुरक्षा विभागाकडून अपहरणाच्या गुन्ह्याची उकल १)चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. २५२/१८ भा.द.वि. कलम ३६३ मधील अपहत मुलगी वय १८ वर्षे,रा.पुणे व आरोपी नामे सिध्दार्थ उर्फ सोन्या सुनिल गायकवाड, रा. सदर यांचा सामाजिक सुरक्षा विभागाकडुन तपास करत असताना, सदर आरोपींचे सध्या वापरते मोबाईल नंबर बाबत माहीती प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने तपास करुन सदर पिडीत मुलगी व आरोपी यांना दि.०९/०९/२०१९ रोजी वाकड पुणे येथुन ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.

२)हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९१५/१८ भा.द.वि. कलम ३६३ मधील अपहृत मुलगी वय १६ वर्षे, रा.पुणे आरोपी नामे रणजीत मारुती मोरे वय २३ वर्षे, धंदा प्लंबींग रा. मांजरी बु// ता. हवेली जि. पुणे यांना ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कारवाई होणेसाठी अपहृत मुलगी व आरोपी यांना हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

३)येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.४७२/१८ भा.द.वि. कलम ३६३ मधील अपह्रत मुलगी वय १६ वर्षे, रा.पुणे व आरोपी नामे विकास भागवत सोनावणे वय २६ वर्ष, रा. सदर यांचा सामाजिक सुरक्षा विभागाकडुन तपास करत असताना, सदर आरोपींचे सध्या वापरते मोबाईल नंबर बाबत माहीती प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने तपास करुन सदर पिडीत मुलगी व आरोपी यांना दि. २२/०९/२०१९ रोजी विठठल मंदीर, आंबीवली गाव, पाटील चाळ कल्याण ग्रामीण ठाणे येथुन ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.

४)नवरात्र उत्सवानिमीत्त प्रतिबंधात्मक रात्री गस्त दरम्यान हॉटेल, लॉजेस तपासणी दरम्यान सहकार नगर पो.स्टे येथील सागर लॉज चेक केले असता अल्पवयीन मुलगी वय १६ वर्षे रा,सांगली ही अनिकेत खोत वय २२ वर्षे,रा. सदर यांचेसोबत मिळुन आल्याने अधिक चौकशी केली असता कुरळप पो.स्टे जि.सांगली येथे गु.र.नं. १९८/२०१९ भादवि ३६३ दाखल असुन सदर गुन्हयातील अपहृत मुलगी व आरोपी असल्याचे समजल्याने त्यांना ताब्यात घेवुन सहकारनगर पो.स्टे येथे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाची उकल करण्यात आली.

५)हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४१५/१८ भा.द.वि. कलम ३६३ मधील अपहृत मुलगी वय १७ वर्षे, रा, पुणे व आरोपी नामे सिध्यराम ऊर्फ पिंटु शिवलिंगप्पा जाडर वय-२३ वर्षे, धंदा हमाली रा.स.नं-१५१ कोलावरि डी हॉटेल मागे मांजरी रेल्वे गेट जवळ मांजरी बु//ता. हवेली जि. पुणे यांचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने प्राप्त पत्यावर जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी अपहृत मुलगी
व आरोपी मिळुन आल्याने त्याना ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कारवाई होणेसाठी हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही गुन्हे शाखेचे श्री.अशोक मोराळे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंह, पोलीस उप-आयुक्त गुन्हे,यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील पो.नि. श्रीमती.वैशाली चांदगुडे, पो.उपनि, श्री. श्रीधर खडके यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील पो.हवा. कुमावत, क्षिरसागर,मोहीते, जगताप, पुकाळे, शिंदे, माने, कांबळे, पठाण, करपे, कोळगे, खाडे व पो शि चव्हाण पो शि भांडवलकर यांनी केलेली आहे.

- Advertisement -