पुणे: 6 ऑगस्ट रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे पुणे शाखेकडील पोलीस हवालदार कुमावत यांना मिळालेल्या माहितीवरून एम के रददी डेपो शेजारी ताडिवाला रोड पुणे येथे बेकायदेशीर जुगार अड्डा चालु असलेबाबत खबर मिळालेवरून तात्काळ बातमीची पडताळणी करुन पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे सामाजिक सुरक्षा विभाग (गुन्हे) पुणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री. मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर मटका,गुडगुडी,अंदर बाहर,सोरट अड्डयावर छापा टाकला. ३९ हजार ६१०/- रु. किंमतीची रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य (मोबाईल सह) असा एकूण माल जप्त केला आहे. जुगार घेणारे व खेळणारे ३५ व्यक्तींनविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. वरील नमुद कारवाई श्री. बच्चनसिंग पो.उप.आयुक्त गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीमती वैशाली चांदगुडे सामाजिक सुरक्षा विभाग, (गुन्हे) पुणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री मिसाळ यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील पो.हवा. कुमावत, पो हा क्षिरसागर, पो ना चव्हाण, पो.ना. माने, पो.ना.कांबळे, पो.ना.पठाण, पो.शि.कोळगे, पो.शि खाडे व पो शि चव्हाण यांनी केलेली आहे
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडुन जुगार अड्डयावर छापा
- Advertisement -