Home बातम्या महत्वाच्या बातम्या सामान्यांना दिलासा; आजपासून एलपीजी गॅसचे नवे दर लागू

सामान्यांना दिलासा; आजपासून एलपीजी गॅसचे नवे दर लागू

नवी दिल्ली : सामान्य नागरीकांना दिलासा देणारी बातमी आहे. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 1 जुलैपासूून 100 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीतील घरगुती वापरासाठीचा सिलेंडर 636 रुपयांना मिळणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन समितीने रविवरी प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.

अनुदानित सिलेंडर घेताना सिलेंडर घेताना बाजार मूल्य द्यावं लागतं. त्यानंतर अनुदानित ग्राहकांच्या खात्यात जमा होतं.

ग्राहकांना एका वर्षात 12 अनुदानित सिलेंडर मिळतात. एलपीजी दरांमध्ये ग्राहकांना 142.65 रुपयांचं अनुदान मिळेल. यामुळे एलपीजी दर 494.35 रुपये होतील.