Home बातम्या ऐतिहासिक सामान्य शाळेतील रिक्त पदांवर समायोजित करण्याच्या नियुक्तीमधील गैरव्यवहाराची चौकशी करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

सामान्य शाळेतील रिक्त पदांवर समायोजित करण्याच्या नियुक्तीमधील गैरव्यवहाराची चौकशी करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
सामान्य शाळेतील रिक्त पदांवर समायोजित करण्याच्या नियुक्तीमधील गैरव्यवहाराची चौकशी करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 22 : शंभर टक्के अनुदानित शाळांमधील विशेष शिक्षकांची सामान्य शाळेतील रिक्त पदांवर समायोजित करण्याच्या नियुक्तीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य नागोराव गाणार यांनी म.वि.प. नियम 93 अन्वये सूचना मांडली होती त्यावर शालेय शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी निवेदन केले.

मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, या प्रकरणात 1300 शिक्षकांचा समावेश आहे. त्यातील 633 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबत समितीकडून चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल.

000

काशिबाई थोरात/विसंअ/22/03/2022