Home अश्रेणीबद्ध सारसबाग दीपावली पहाट महोत्सव 2019

सारसबाग दीपावली पहाट महोत्सव 2019

0

सारसबाग दीपावली पहाट महोत्सव 2019

पुणे : परवेज शेख दीपावली पहाट महोत्सव निमित्त दिनांक 28/10/2019 रोजी सारसबाग येथे येणाऱ्या नागरिकांना पुणे पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की दरवर्षी सदर महोत्सवासाठी पुणे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. सदर वेळी येणाऱ्या नागरिकांकडून वाहने रस्त्यावर कोठेही पार्क केली जातात त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.त्यामुळे उद्या दिनांक 28/10/2019 रोजी सारस बाग या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर वेळी लक्ष्मीनारायण चौक ते मित्र मंडळ चौक व मित्रमंडळ चौक ते सावरकर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सदर ठिकाणी टू व्हीलर चे पार्किंग करण्यात यावे, तसेच सावरकर चौक ते निलायम ब्रिज या रस्त्यावरही टू व्हीलर चे पार्किंग करावे,निलायम टॉकीज चे पार्किंग, सणस ग्राउंड व आदम बाग मज्जिद यामधील रस्ता,विश्व हॉटेल ते पुरम चौक हा आदम बाग मज्जिद शेजारील रस्ता, ना सी फडके चौक ते विश्व हॉटेल चौक हा रस्ता,आदमबाग मज्जिद समोरील हिराबाग चौकाकडे जाणारा रस्ता, नेहरू स्टेडियम चे पार्किंग,गणेश कला क्रिडा रंगमंच स्वारगेट येथील पे अँड पार्किंग या ठिकाणांचा वाहने पार्क करण्यासाठी वापर करावा. नागरिकांनी वरील ठिकाणी आपल्या गाड्या पार्क कराव्यात इतरत्र कोठेही आपल्या गाड्या पार्क करू नये व पोलिसांना सहकार्य करावे.


सदर कार्यक्रमासाठी वाहतूक शाखेकडे 2 सहाय्यक पोलीस आयुक्त,2 पोलीस निरीक्षक,13 सहायक पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व 100 कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन कडील 1 सहाय्यक पोलीस आयुक्त ,2 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व 90 कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन