हायलाइट्स:
- अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर नेहमीच असते चर्चेत
- सारा अली खाननं नुकतंच घेतलं आसाम येथील कामाख्या देवीचं दर्शन
- मंदिराबाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सारावर होतेय टीका
सारा अली खाननं रविवारी तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आसाम येथील कामाख्या देवीच्या मंदिरासमोर उभी असलेली दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या सारानं यावेळी आसामची पारंपरिक शाल घेतली आहे. तसेच कपाळाला टीकाही लावला आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. अनेक युझरना सारा हा अंदाज पसंत पडला असला तरीही काहींनी मात्र कमेंट करत तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सारा अली खानचे कामाख्या देवीच्या मंदिरासमोरील फोटो पाहून काही युझर्सनी तिचं कौतुक केलं असलं तरी काही युझर्सनी मात्र तिच्यावर टीका केली आहे. मुस्लीम असताना हिंदू मंदिरात जाण्यावरून युझर्सनी तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान याआधी फेब्रुवारी महिन्यात सारा अली खान तिची आई अमृता सिंहसोबत अजमेर शरीफ दर्गाच्या दर्शनासाठी गेली होती. ज्यावेळीही तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा देखील झाली होती.
सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायंच तर सारानं २०१८ साली सुशांतसिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर रणवीर सिंह सोबत ‘सिंबा’, कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ आणि वरुण धवनसोबत ‘कुली नंबर १’ हे चित्रपट रिलीज झाले. आगामी काळात ती अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच विकी कौशलसोबत ‘द इमोर्टल अश्वत्थामा’मध्येही ती दिसणार आहे.