हायलाइट्स:
- सारेगमप लिटिल चॅम्प्समधील स्वरा जोशीची आई देखील आहे प्रसिद्ध गायिका
- स्वराची आईच देत आहे तिला संगीताचे शिक्षण
- सारेगमप लिटिल चॅम्प्स कार्यक्रम झाला अल्पावधीत लोकप्रिय
स्वरा जोशी हिची आई म्हणजे प्रसिद्ध गायिका केतकी भावे- जोशी. सारेगमप लिटिल चॅम्पमध्ये स्वरा सहभागी झाल्याचा आनंद आणि अभिमान केतकीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. केतकीने लिहिले की ‘स्वरा मला तुझा अभिमान वाटतो.’ सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमासाठी झालेल्या ऑडिशनमधून स्वरा जोशीची निवड झाली. स्वरा गाण्याचे धडे तिच्या आईकडूनच गिरवत आहे. अगदी पहिल्या भागापासून स्वराने तिच्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
स्वराची आई केतकी ही देखील अशा सांगितिक कार्यक्रमातून नावारुपाला आली आहे. केतकी सिंगिंग स्टार्स या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे याची मेन्टॉर म्हणून सहभागी झाली होती. केतकीने आतापर्यंत १०० हून अधिक मराठी गाणी गायली आहे. आता ती मुलीला गाण्याचे प्रशिक्षण देत आहे.
सारेगमप लिटिल चॅम्प्स या रिअॅलिटी कार्यक्रम १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. या कार्यक्रमात रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे या स्पर्धेचे परीक्षक आहेत. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.