Home शहरे जळगाव सावखेडे तुर्क येथील माध्यमिक विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश, हर्षल तेली विद्यालातून प्रथम !

सावखेडे तुर्क येथील माध्यमिक विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश, हर्षल तेली विद्यालातून प्रथम !

प्रतिनिधी:- शैलेश चौधरी

पारोळा : योगेश्वर माध्यमिक विद्यालय (सावखेडे तुर्क) व डी. एम. पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,पारोळा येथील एकूण निकाल ९८ टक्के लागला.
मार्च २०२० च्या परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. याबद्दल संस्थेचे चेअरमन डी. एम.पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर.जी. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तेली हर्षल दिनकर याने या परीक्षेत ८३.२० टक्के गुण मिळवून संपुर्ण विद्यालयात प्रथम आला आहे.

तर विद्यालयात द्वितीय क्रमांक संपादन करणारे पाटील उमेश धोंडू आणि आणि खैरनार सतिष गौतम यांना अनुक्रमे ८२% गुण प्राप्त झाले. तर अनुक्रमे कुमारी पाटील हर्षदा प्रेमसिंग हीने ८०.४०टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला याबद्दल परिसरात या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील प्रथम क्रमांक पटकावणारा विद्यार्थी तेली हर्षल दिनकर हा ‘गर्जना न्यूज’चे एरंडोल तालुका प्रतीनिधी शैलेश चौधरी यांचा भाचा असुन त्यांनी देखिल त्याचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.बरोबरच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राध्यापक तसेच शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील अभिनंदन केले व सदीच्छा व्यक्त केल्या.