Home गुन्हा सावधान आपल्या घराच्या दरवाजा उघडा असेल तर ,आपला किंमती मोबाईल चोरी होईल …

सावधान आपल्या घराच्या दरवाजा उघडा असेल तर ,आपला किंमती मोबाईल चोरी होईल …

0

पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी) रमेश कांबळे
उघड्या घरातून मोबाईल चोरी करणारया ,गुन्हेगाराच्या ,युनिट 5 च्या पोलिसांनी मूसक्या अवळल्या असून ,त्याच्या कडून सुमारे ६ लाख ७२ हजार रुपये कितीचे मोबाईल जप्त केले आहेत.देहूरोड ,तळेगाव ,तळेगाव एमआयडीसी ,चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण १२ गुन्हे उघड केले आहेत

शनिवारी ,पोलीस निरीक्षक राम गोमारे व गुन्हेशाखा युनिट 5 कंदील,पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना खबर्या मार्फत एक इसम मोबाईल विक्री करण्यासाठी ,आंबी चौकात हॉटेल शिव मल्हार ढाब्याजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार दोन पथके सदरच्या ठिकाणी दाखल झाली, त्या ठिकाणी गुलाबी रंगाची पिशवी हातात असलेल्या इसमास , ताब्यात घेतले पंचासमक्ष तपासणी केली असता, आरोपी शिवराज बाळासाहेब वाघोले,वय- १९ ( रा.आगळे वस्ती पाचाणे, ता.मावळ ,जि.पुणे )याला महागड्या किंमतीचे विविध कंपन्यांचे, 30 मोबाईल मिळून आले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, घरात आणि काही मित्रांच्याकडे ,असलेले मोबाईल जप्त केले.असे ६ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे एकूण 40 मोबाईल हस्तगत केले.ही कामगिरी ,वरिष्ठ अधिकारी ,आणि पोलीस निरीक्षक राम गोमारे व गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस कर्मचारी दयानंद खेडेकर ,रामकुमार इधारे, फारुख मुल्ला ,धनंजय भोसले ,संदीप ठाकरे,ज्ञानेश्वर गाडेकर, दत्तात्रय बनसोडे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पडली.आरोपी शिवराज वाघोले यास पुढील तपासकामी, तळेगाव एमआयडी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून , चाकण ,तळेगाव एमआयडीसी, देहूरोड ,या भागातील ज्यांचे मोबाईल चोरीस गेले आहेत ,त्यांनी तळेगाव एमआयडीसी संपर्क साधावा ,असे आव्हान करण्यात आले आहे.