Home ताज्या बातम्या सावधान! तुमची वॉशिंग मशीन होत आहे घातक बॅक्टेरियाचं घर, जाणून घ्या कसा कराल बचाव

सावधान! तुमची वॉशिंग मशीन होत आहे घातक बॅक्टेरियाचं घर, जाणून घ्या कसा कराल बचाव

0

काही दिवसांपूर्वी जर्मनीतील एका हॉस्पिटलमध्ये नवजात बाळांना घातल्या जाणाऱ्या कपड्यांवर आजार पसरवणारे कीटाणू आढळून आलेत. या किटाणूंवर जास्तीत जास्त औषधे प्रभाव करू शकत नाही. तपासणी केली तर असं आढळून आलं की, हॉस्पिटलच्या लॉन्ड्रीमधून हे घातक कीटाणू येत आहे.

तज्ज्ञांनुसार, आजच्या आधुनिक जगात वॉशिंग मशीनमध्ये कीटाणू नष्ट करण्याची क्षमता जुन्या पारंपारिक मशीनींपेक्षा कमी असते. अप्लाइड अ‍ॅन्ड इन्वायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी  जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, जर्मनीच्या त्या हॉस्पिटलमध्ये भरती मुलांचं नशीब चांगलं होतं की, ते या कीटाणुंचे शिकार झाले नाहीत.

वॉशिंग मशीनमध्ये काय आहे?

(Image Credit : dailybayonet.com)

जर आधुनिक मशीन्समध्ये बॅक्टेरिया आढळून येत असतील तर वॉशिंग मशीन वापरणं सुरक्षित आहेत की नाही. आजकाल मशीनमध्ये थंड पाण्यान कपडे धुतले जातात. यातच कपडे अर्धे सुकवले जातात. तज्ज्ञांनुसार, या मशीन्सच्या रबर सीलमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. हे हळूहळू संपूर्ण मशीनमध्ये पसरतात. नंतर हेच बॅक्टेरिया कपड्यांच्या माध्यमातून शरीरात जातात आणि वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरतात.

किती घातक आहेत बॅक्टेरिया?

युनिव्हर्सिटी ऑफ बॉनमध्ये इन्स्टि्ट्यूट ऑफ हायजीन अ‍ॅन्ड पब्लिक हेल्थचे निर्देशक डॉ. मार्टिन एक्सनर यांच्यानुसार, स्वच्छता मोहिमेसोबत जुळलेल्या लोकांसाठी हे एक मोठं आव्हान ठरणार आहे. कारण आजारांची कारणे घरातच निर्माण होत आहेत आणि रोज वाढत आहेत.

न्यू यॉर्क नॉर्थ शोर युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉ. ब्रूस हिर्श्स याला फार मोठा धोका मानत नाहीत. त्यांचं मत आहे की, अशाप्रकारचे बॅक्टेरिया तशेही आपल्या आजूबाजूला असतात. थोडी काळजी घेऊन ही समस्या दूर केली जाऊ शकते.

वॉशिंग मशीनची स्वच्छता गरजेची

कपड्यांची स्वच्छता आणि त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष द्या. पण जर घरात वयोवृद्ध असतील आणि लहान मुलं असतील तर ही जबाबदारी अधिक वाढते. मशीन अशा ठिकाणी अजिबात ठेवू नका जिथे ओलावा असेल. याने बॅक्टेरिया अधिक वाढण्याचा धोका असतो. या बॅक्टेरियामुळे निमोनिया, त्वचा रोग आणि डायरियासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे वॉशिंग मशीन स्वच्छ ठेवा.