Home शहरे औरंगाबाद सावरगांव येथे परप्रांतीय मजुरांना धान्य वाटप

सावरगांव येथे परप्रांतीय मजुरांना धान्य वाटप

0

औरंगाबाद (प्रतिनिधी) –

कन्नड तालुक्यातील सावरगांव येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लाँकडाउन करण्यात आल्याने मध्यप्रदेशातील काही रोजमजूर करणारे परप्रांतीय मजुर सावरगांव येथे अडकले आहे.त्यांना एक हात मदतीचा म्हणून ग्रामपंचायत प्रशासन तसेच गावातील नागरिकांनी गावात गहु,व ईतर धान्य गोळा करून कार्यालय ग्रामपंचायत समोर मजुरांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सिध्दु सुलतान शेख, पोपटराव निकम, पोलीस पाटील दशरथ सोनवणे,उपसरपंच यांनी परिश्रम घेतले.